
नवी मुंबई (प्रतिनिधी). नरेश सोनवणेरोहिणी प्रकाशन मुंबई यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्ताने अकरा पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्सवात दिनांक ५/१०/२०२५ रोजी ऐरोली येथे संपन्न झाला. यावेळी सामाजिक विषयावरील नाटिका आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन संपन्न झाले. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.विजयजी चौगुले साहेब ( उपनेते शिवसेना महाराष्ट्र राज्य ), श्री.उत्तमराव तरकसे सर ( नवी मुंबई क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी ), श्री.प्रमोद सूर्यवंशी सर ( कवी लेखक ग्राफिक्स कार ) श्री. नमाई सुभाष नाईक सर, ( कवी निवेदक ) श्री नरेंद्र कदम सर( प्राध्यापक आदित्य कॉलेज लेखक चित्रकार नाटककार ) उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. तारा रामचंद्र ठाकरे मॅडम ( मुख्याध्यापिका प्रबोधन विद्यालय ) श्री.रामू वाघमारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. लेखक कवी चंद्रहास धुमाल सर यांच्या संसार माया, भाग्यविधाता कवीदेर्व,पुष्पमाला, आरोग्यतीर्थ या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. तर कवी,लेखिका सुनंदा रामटेके यांच्या किमया आणि ‘क्षण वेचलेले’ ही दोन पुस्तकं प्रकाशित झाली. यांचा फुलात जिथे फुल येते, पुस्तक प्रकाशन करण्यात आले. रघुनाथ मोहिते सर यांच्या ‘शब्दचित्र ‘तर डॉक्टर स्मिता सदानंद मुकणे यांच्या ‘ऋतुरंग ‘,पसरलेले सुरेख रंग या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आलं तर दिवाकर सभारंजक सर यांच्या ‘शतकयात्री’ या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आल. कार्यक्रमाची सुरुवात आदर्शांच्या प्रतिमाना पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशिका रोहिणी माया राम वाघमारे यांनी आपला तीन वर्षाचा प्रवास थोडक्यात मांडला प्रमुख पाहुणे श्री विजयजी चौगुले साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रकाशन आणि प्रकाशिका यांचं कौतुक करून साहित्य प्रवासाला शुभेच्छा दिल्या या साहित्याच्या वाटचालीस आपण खंबीरपणे प्रकाशनाच्या मागे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी ही भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लेखक,कवी,नाटककार संतोष रामचंद्र जाधव सर आणि सह कलाकार उपासना कीरपण यांनी ‘दरवाजा बाहेर’ ही सामाजिक विषयावरील डोळ्यात पाणी आणणारी आणि समाजाच्या आजच्या परिस्थितीला वाचा फोडणारी एक हृदयस्पर्शी नाटिका सादर केली. त्याचे तांत्रिक व्यवस्थापन माननीय रमेश मारुती पाटील सर यांनी पाहिलं. या नाटीकेने सर्वांची मने जिंकून कार्यक्रमाला विशेष रंग चढवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामवंत तीस कवींनी आपल्या निसर्ग,मानव,प्रेम आणि सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या सदाबहार कविता सादर केल्या त्यामध्ये कवी शैलजा करोडे, सुभाष नाईक, सिद्धार्थ मगर,संतोष जाधव, शितल शिंदे, प्रियंका कुटे, निर्मला वेठम, रोहिणी जाधव, गणेश रिंगे, अनुराधा ससाने, आकाश वेले, बुद्ध कन्या भालेराव, रेणुका अगुरेड्डी, प्रसाद दोडकुलकर, रफिक इनामदार, रमेश काळुखे, योगेश मांदाडे, स्वप्निल कांबळे, महादेव सोळगे, रघुनाथ भिसे, विवेक करंजीकर, अविनाश ढळे, रजनी भागवत, डॉ. स्मिता मुकणे, प्रज्ञा सोनपसारे या नामवंत कवींनी आपल्या सदाबहार कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी लेखक,निवेदक नरेश मंगल सोनवणे सर यांनी अतिशय उत्कृष्ट केले. तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन कवी लेखिका प्रतिक्षा तितकरे मॅडम कुणाल मगर यांनी पाहिलं. कार्यक्रमाचे चित्र छायांकन निवास मोरया यांनी केलं
