
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५५ वा दिवस* माणूस, स्वतःच्या बाहेरील नाना देव-देवतांमागे व्यर्थ धावपळ करीत वर्तुळ पूर्ण करतो, आणि अखेर जिथून त्याने सुरुवात केली होती तिथे त्या मानव आत्म्याप्रत परत येतो, आणि त्याला आढळून येते की, ज्या ईश्वराला तो रानावनात नि गिरिकंदरात घुंडाळीत होता, ज्याला शोधीत तो मुनीथोंतीर्थी देवळारावळात, या वा त्या स्वर्गलोकात भटकत होता, स्वर्गातील आपल्या सिंहासनावर बसून जगावर राज्य करणारा अशीही ज्या ईश्वराविषयी तो कल्पना करीत होता, तो त्याचा स्वतःचा आत्माच आहे. मी तोच, नि तोच मी. माझ्याखेरीज आणखी कोणीही ईश्वर नव्हता, आणि हा क्षुद्र ‘मी’ कधीच अस्तित्वात नव्हता
*स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर १९ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन पौर्णिमा /कृष्ण वद्य ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५
★ १९१६ रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी देणारे, समाजसुधारक, संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्मदिन.
★ १९६८ ‘ग्रामगीता’ ग्रंथाचे लेखक, राष्ट्रसंत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी.
