
सिन्नर ( प्रतिनिधी )१० ऑक्टोबर २०२५ आदिवासींचे आधारस्तंभ काळूराम काका धोडडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.*यावेळी निसर्गवासी काळूराम काका धोदडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. *या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की*काळूराम काका धोदडे हे आदिवासी समाजाचे एक आधारस्तंभ होते, ज्यांनी आपल्या कार्याद्वारे आदिवासींच्या हक्कांचे आणि स्वाभिमानाचे संरक्षण केले

.त्यांनी आदिवासी समाजातील बांधवांना सोबत घेऊन आदिवासींसाठी भूमिसेनेची स्थापना: त्यांनी १९६३ मध्ये भूमिसेनेची स्थापना करून आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी चळवळ सुरू केली. आदिवासींना त्रास देणाऱ्या प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी लढा दिला. आदिवासींचे हक्क: जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींच्या अधिकारांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. आणीबाणीच्या काळात १९७५ च्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या सरकारला आदिवासींसाठी ठोस काम करण्याचे आवाहन करणारे ते एक धाडसी नेते होते. त्यांना पालघर-ठाणे जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागांतही त्यांचे कार्य पोहोचले होते.त्यांच्या माध्यमातून आदिवासी एकता परिषदेचे अनेक राज्यांमध्ये आदिवासी संस्कृती संमेलन होत आहेत.गेल्या अनेक दशकांहून अधिक काळ आदिवासींसाठी ते चळवळीत सक्रिय होते आणि त्यांचे १० ऑक्टोबर २०२४ मध्ये निधन झाले. असे आदिवासींचे आधारस्तंभ काळूराम काका धोदडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!*या कार्यक्रमाचे सुञसंचलन आकाश धोंगडे यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर रुपेश मुठे आभार यांनी मानले*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे गणेश पाटिल, आकाश धोंगडे,समाधान लाड,संदिप मुठे, सुरज खर्डॅ आदि.उपस्थित होते
