
नांदगाव( प्रतिनिधी)
येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नांदगाव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीनदिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे उद्घाटन दि. ०९/१०/२०२५ रोजी करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते मा. प्रा. डॉ. नरेंद्र आबा पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, बहि:शाल शिक्षण मंडळ केंद्र कार्यवाह प्रा. योगेश वाघ, सदस्य प्रा. संदीप दोंड, प्रा. अनिल राठोड उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. नरेंद्र आबा पाटील (सायखेडा) यांनी ‘पानिपतची तिसरी लढाई’ या विषयाने गुंफले.
आज दिनांक १०/१०/२०२५ रोजी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. दिलीप बी. शिंदे (नाशिक) यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि सकारात्मक दृष्टिकोन’ या विषयाने गुंफत उपस्थित विद्यार्थ्यांना उपस्थित विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून आपले व्यक्तिमत्व चांगले घडवून आणता येते असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा.योगेश वाघ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र हिरे यांनी केले. व्याख्यानमाले प्रसंगी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
