
नांदगाव (प्रतिनिधी): कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नांदगाव येथे “व्यक्तिमत्व विकास आणि सकारात्मक दृष्टीकोन” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन. भवरें, उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे, तसेच प्रमुख आयोजक प्रा. योगेश वाघ, डॉ. प्रसाद, प्रा.राजेद्र हिरे आणि डॉ.अनिल राठोड उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ . दिलीप बी शिंदे (नाशिक)यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू, आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग, तसेच जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे महत्त्व याबद्दल प्रभावी मार्गदर्शन केले.

त्यांनी आपल्या अनुभवांमधून दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरली.प्राचार्य डॉ.आर.एन. भवरें यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करणाऱ्या अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.योगेश वाघ यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व मान्यवरांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. अनिल राठोड यांनी केले.

