
सिन्नर – विद्यार्थिनींना अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांची आवड निर्माण व्हावी, दिवाळीत आकाशकंदीलाचे महत्त्व समजावे आणि स्वावलंबनाची जाणीव व्हावी या उद्देशाने मातोश्री चांडक कन्या विद्यालयात इयत्ता 6 ते 8 विच्याविद्यार्थिनींसाठी आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत विविध रंग व आकारांच्या माध्यमातून आकर्षक आकाशकंदील तयार केले. कला शिक्षिका सोनाली मोरे यांनी कंदील बनविण्याची पद्धत समजावून सांगत विद्यार्थिनींना सर्जनशीलतेचा अनुभव दिला. कार्यशाळेनंतर आपल्या हातांनी तयार केलेले रंगीत आकाशकंदील दिवाळीत घरावर लावण्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर झळकत होता. या उपक्रमास शालेय समिती अध्यक्ष ॲड. श्रीराम क्षत्रिय व पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे यांनी भेट देऊन विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सुनीता कर्डिले व पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी विद्यार्थिनींना असे सर्जनशील आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
