
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५४ वा दिवस या जगात खरोखर कुणीही सुखी नाही. एखादा मनुष्य श्रीमंत असतो, त्याच्याजवळ खायला भरपूर असते, पण त्याची पचनशक्ती बरोबर नसते, आणि म्हणून तो काही खाऊ शकत नाही. एखाद्याची पचनशक्ती फार चांगली असेल, त्याला बकासुरासारखी भूक लागत असेल, तर तोंडात टाकायला त्याच्याजवळ काहीही नसते. जर एखाद्याजवळ संपत्ती असेल तर संतती नसते. जर एखादा माणूस गरीब व भुकेला असेल तर त्याला खंडीभर मुले असतात व त्यांचे पालनपोषण कसे करावे हे त्याला सुचत नाही. हे असे का? कारण सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याला सुख हवे असेल त्याला दुःखही स्वीकारावे लागेल.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●

*★ भारतीय सौर १८ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन पौर्णिमा /कृष्ण वद्य ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १० ऑक्टोबर २०२५ ★ संकष्ट चतुर्थी
★ १८९९ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, कामगार नेते काॅम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्मदिन.
★ १९०६ इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक ‘मालगुडी डेज’ चे लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्मदिन
★ १९१० हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक असलेले डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्मदिन
★ १९५४ प्र. के अत्रे यांच्या श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले
.★ जागतिक मानसिक आरोग्य दिन.
★ राष्ट्रीय जंतनाशक दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
