
सिन्नर (प्रतिनिधी) मातोश्री चांडक कन्या विद्यालयाची कु. अक्षदा साईनाथ कुलकर्णी हिने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या “सुपर ५०” या उपक्रमांतर्गत NEET मार्गदर्शन वर्गासाठी उल्लेखनीय निवड मिळवली आहे.या माध्यमातून तिला निफाड येथील प्रतिष्ठित आकाश इन्स्टिट्यूट येथे दोन वर्षांचे पूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा सोनवणे,प्रिया कुलकर्णी,संध्या कुलकर्णी, प्रतिभा वाढवणे, राजहंस माळी तसेच इतर सर्व शिक्षक वर्गाचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले आहे.शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे व सर्व सदस्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी कु. अक्षदाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. चांडक कन्या विद्यालयाच्या इतिहासात अक्षदाच्या निमित्ताने प्रथमच सुपर 50 निवड प्रक्रियेत यश प्राप्त् झाले आहे ही शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे यांनी व्यक्त केले आहे(कृपया बातमी घेणेस नम्र विनंती )
