
सिन्नर ( प्रतिनिधी ) दि. ९ — ०९ ॴॅक्टोबर या जागतिक टपाल दिनानिमित्त सिन्नर टपाल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा ग्राहक व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्पे देउन सत्कार करण्यांत आला..

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोष्टमास्तर राकेश अहिरराव, सेवानिवृत्त नायब तहसिलदार महामित्र दत्तात्रय वायचळे, शिक्षक प्रकाश सिरसाट, माहिती व जनसंपर्क खात्याचे से.नि. रवींद्र घोगे प्रामुख्याने उपस्थित होते. माझ्या मामाचे पत्र हरवले या शाळेतील आठवणींपासून ते आज आॅनलाईन पेमेंटची सेवा देणारे सिन्नरचे टपाल कार्यायातील अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत जनतेला देण्यात येणारी सेवा ही अतिशय उत्कृष्ट असल्याचे दत्ता वायचळे यांनी सांगितले.

२१ व्या शतकाच्या वाटचालीत टपालसेवा ही अतिशय महत्वाची सेवा आहे, अनेक कुटुंबांना टपालसेवेचा सहजपणे लाभ घेता येतो. टपालसेवा ही समाजातील संवादाचे महत्वाचे साधन आहे, हा विभाग आता केवळ पत्रांपुरता मर्यादित राहिला नाही तर बँकींग, विमा, गुंतवणुक, आधारकार्ड आणि इतर अनेक उपयोगी सुविधादेखील देत असल्याचे प्रतिपादन से.नि. शिक्षक श्री प्रकाश सिरसाट यांनी केले. पुर्वी टपालाने आप्तेष्ठांना पाठविण्यात येणारे तिळगुळ, भाऊबिजेच्या मनीआॅर्डस, सुख व दुखःद घटनांच्या तारेमार्फत कळविण्यात येणार्या घटना या जुन्या घटनांचा उल्लेख करुन आजच्या डिजीटल युगात ई मेल, व्हाॅट्स अॅप, व्हीडीओ काॅलींग, सोशल मिडीया यामुळे पत्रलेखनाची परंपरा कमी झाल्याचे सांगून माहिती खात्याचे श्री रवींद्र घोगे यांनी आजही भारतात टपाल खात्याचे महत्व पुर्वीइतकेच कायम असून स्पीड पोष्ट, आधारसेवा,ई काॅमर्स इत्यादी सेवाही तत्परतेने दिल्या जात असल्याचे प्रतिपादन केले. टपाल विभाग हा आपल्याला संवाद, विश्वास आणि जगभरातील लोकांना एकत्र जोडण्याची संधी देत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पोष्टमास्तर श्री राकेश अहिरराव यांनी सांगितले तसेच अनेक अनुदानाची खाती उघडून देण्यापासून ते दिवाळीचे फराळ परदेशात पाठविण्याचे काम, लाडकी बहिण, सुकन्या योजना, पीएलआय, बचत घरपोच करण्याचे काम टपाल खाते करीत असल्याचेही श्री अहिरराव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री निलेश कपीले यांनी केले तर आभार श्री प्रशांत कपोते यांनी मानले. याप्रसंगी स र्वश्री कल्पेश वाघ, चेतन सातपुते, अमोल मरभळ,सारीका कर्पे, बाळासाहेब दराडे, श्रावण भागवत, भाउसाहेब बर्गे, गणेश सानप, महेश त्रिभुवन, वैभव माळोदे, तेजस बागुल, ज्ञानेश्वर दराडे, आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यांत आला.. याप्रसंगी सिन्नर टपाल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
