
.ओझर: (वार्ताहर)’मविप्र’ संचलित ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात संभाजीनगर येथील जागतिक आरोग्य सल्लागार, व छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य सल्लागार पुरस्कार विजेते सुभेदार दीपक भुते यांचे आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी प्रास्ताविकात मान्यवरांचा परिचय करून दिला. सुभेदार दीपक भुते यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना ‘आरोग्य मार्गदर्शन व वैयक्तिक स्वच्छता’ या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. व्यासपीठावर मुख्याध्यापक सोपान वाटपाडे आरोग्य सल्लागार प्रियंका वाघ बबन नागरे दीपक विधाते सुरेखा विधाते संजय आहेर सैन्यदल अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब लभडे यांनी केले.
