
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५३ वा दिवस आत्म्याची जास्त प्रमाणात अभिव्यक्ती म्हणजेच ‘चांगले’ वा ‘शुभ’ आणि कमी प्रमाणात अभिव्यक्ती म्हणजेच ‘वाईट’ वा ‘अशुभ’ होय. लहानपणी चांगल्या वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी खरोखर वाईट असतात आणि वाईट वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी खरोखर चांगल्या असतात ! आपले विचार कसे बदलत जातात! आपले विचार कसे अधिकाधिक उच्च होत जातात! एकेकाळी जे आपण खूप चांगले समजत होतो तेच आता तितके चांगले वाटत नाही. याप्रमाणे चांगले व वाईट ही आपल्या मनाच्या विकासावर अवलंबून आहेत, त्यांचे बाहेर कुठे अस्तित्व नाही. त्यांच्यात केवळ प्रमाणाचा फरक आहे. सर्वकाही आत्म्याचीच अभिव्यक्ती आहे. आत्मा सगळ्या वस्तूंमधून प्रकट होत असतो.
स्वामी विवेकानंद.. ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन पौर्णिमा /कृष्ण वद्य ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ९ ऑक्टोबर २०२५ ★ १६३५ वीर जिवा महाले यांचा जन्मदिन
★ १८७७ ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पंडित गोपबंधुदास तथा उत्कलमणी यांचा जन्मदिन
★ १८९२ इतिहासकार, समाजसुधारक, पत्रकार, शतपत्रेकार, लोकहितवादी रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचा स्मृतिदिन.
★ १९७० भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपूर्द
★ जागतिक टपाल दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
