
सिन्नर ( वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) :सिन्नर तालुक्यातील डुबेरेवाडी (कृष्णनगर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजाराम लक्ष्मण वारुंगसे यांची आवर्तन पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच दत्तू गोफणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड पार पडली.सभेदरम्यान सदस्य संतोष काशिनाथ सदगीर यांनी उपसरपंच पदासाठी सुचना मांडली, तर बस्तीराम एकनाथ गुळवे यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने वारुंगसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

या प्रसंगी माजी सरपंच भास्कर गोफणे, माजी उपसरपंच शरद गोफणे,गणपत उघडे, संदीप लेहकर, रंगनाथ पवार, जनाबाई लेहकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नानाभाऊ वारुंगसे, उपाध्यक्ष बाळू गोफणे, तसेच नवनाथ गोफणे, नंदू गुरूकुले, किसन सदगीर, नामदेव वारुंगसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवड प्रक्रियेनंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने आणि पारदर्शकतेने काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच राजाराम वारुंगसे यांनी दिली. ग्रामस्थांनी त्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करीत शुभेच्छा व्यक्त केल्या.
