
डोंबिवली (दीपक इंगळे शहर प्रतिनिधी) डोंबिवली पश्चिम, गोपीनाथ चौक जगदंबा मंदिर येथील शांताराम निवास चाळीत राहणारा, कुमार आयुष एकनाथ कदम वय वर्ष १४ याचा नाल्यावरील चेंबर वर झाकण नसल्याने नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २८/०९/२०२५रोजी रात्री १० ते ११ वाजे दरम्यान घडली होती. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंबीर दखल घेत, आयोगाने एमएमआरडीएचे महानगर आयुक्त व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांना नोटीस बजावत, आठ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी दिले आहेत. डोंबिवलीतील पश्चिम येथील गोपीनाथ चौका शेजारी असलेल्या जगदंबा मंदिर परिसरात गटार व नाल्याचे काम करत असताना मलगाड्यांच्या रहदारीमुळे चेंबर वरच झाकण फुटून फुटले होते. नवरात्री उत्सवामध्ये जगदंबा मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष कदम हा तिथे महाप्रसाद घेण्यासाठी आला होता, व त्या चेंबरचा ताटामध्ये राहिलेलं उस्ट अन्न टाकण्यासाठी व हात धुण्यासाठी उपयोग करण्यात आला होता. त्यामुळे त्या उघड्या झाकणाच्या होल मधून आयुष्य गटारामध्ये पडला व त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी केलेल्या दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर अपघात स्थळापासून जवळजवळ ३५० मीटर अंतरावर आयुष्य मृतदेह नाल्यात बाहेर पडला होता रिंग रोडच्या कामाचा भाग म्हणून या ठिकाणी नाल्याचे काम सुरू होते.

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेत, मानवी हक्काचे संरक्षण करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आठ डिसेंबरला ठेवण्यात आली असल्याची माहिती माहिती अधिकार आयोगाचे प्रतिबंधक विजय केदार यांनी दिली आहे
