
ओझर:(प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आधुनिक शिल्पकार माजी सरचिटणीस व खासदार कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांचे हस्ते झाले. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ पवारांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, डॉ पवारांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या बीदाप्रमाणे मविप्र संस्थेच्या विकासात भरीव कार्य केले असून शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर त्यांचा भर होता

तसेच ‘असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी’ या वाक्यातून त्यांच्या कार्याचा ठसा उमटवून आपणास त्यांच्या विचारांची सदैव प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम वर्षा पाटील मोहन क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
