
अंदरसुल (प्रतिनिधी): अंदरसुल येथे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गतपोषण आहार अभियाना कार्यक्रम संपन्न झाला अंदरसुल ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या (दि.७) पोषण आहार अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लताबाई जानराव होत्या यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद तारू,अंगणवाडी पर्यवेक्षक वंदना शिंपी यांनी उपस्थित माता व बालकांना पोषण आहार विषयक मार्गदर्शन केले यात प्रामुख्याने विविध प्रकारच्या दाळी,फळे,पालेभाजी यांचे महत्व विषद करीत आहाराबाबत जनजागृती केली अंगणवाडी अंदरसुल बिटच्या वतीने सभागृहात आकर्षक सजावट व रांगोळी काढण्यात आली होती तसेच पोषण आहारातील दाळी ,पालेभाज्या, विविध प्रकारची फळे आदी पोषण आहार उपलब्ध करण्यात आला होता दरम्यान उपस्थित गर्भवती मातांचे पुजन याप्रसंगी करण्यात आले परिसरातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके,किशोरवयीन मुली,गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पूरक पोषण,कुपोषित एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा भाग आहे यामध्ये मुलांमधील कुपोषण आणि कुपोषित मुलांची संख्या कमी करणे.गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा करणेपोषण आहार अभियानाचा उद्देश असल्याचे मनोगत सरपंच लताबाई जानराव व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका पुनम धुमाळ यांनी केले याप्रसंगी सरपंच लताबाई जानराव ग्रामविकास अधिकारी अशोक अडसरे,अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना शिंपी,वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद तारू,एकनाथ जानराव,मुख्याध्यापक प्रभाकर चव्हाण,आशा गटप्रवर्तक सुनंदा परदेशी,पर्यवेक्षिका रोहिणी देवरे,अंगणवाडी सेविका कमल जाधव पुनम जगताप सविता पागिरे सविता सोनवणे संगीता रेशमी संगीता देवरे वंदना थोरात मोहिनी थोरात मंगल भालेराव नीता वाकचौरे मंदा वाकचौरे शोभा साबळे शैला शिरसागर पुनम धुमाळ आदींसह अंगणवाडी मदतनीस,आशासेविका व अंदरसुल बिट महिला,बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते
