
.ओझर: दि.६ (वार्ताहर) आयसेक्ट कौशल्य महाराष्ट्र विकास यात्रा कार्यक्रम देशाच्या बावीस राज्यात तीनशे जिल्ह्यातून फिरणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ बोरस्ते विद्यालय ओझर येथे पार पडला. यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध स्वंय: कौशल्यांचा विकास योजनेतून उद्योजक व स्वयंपूर्ण अर्थसाह्य संपन्न होणार असल्याचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी संचालक विनेश वर्मा आयसेक्ट कौशल्य विकास, संतोष सोनवणे बाळासाहेब झांबरे रावसाहेब शिंदे चंद्रशेखर अखलकर उपस्थित होते. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते आयसेक्ट कौशल्य विकास यात्रेच्या गाडीचे पूजन व उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब लभडे यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड यांनी केले.
