
भुसावळ (गोपाळकुमार कळसकर) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रनिहाय पुनर्परीक्षा डिसेंबर २०२५ अथवा जानेवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहेत. परीक्षांना प्रविष्ठ होण्यासाठी विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक ५२/२०२५ जारी केले आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोव्हेंबर २०२५ या दुसऱ्या आठवड्यात उपलब्द्ध होतील. हिवाळी परीक्षा २०२५ – २६ (वार्षिक अथवा सत्रनिहाय) संभाव्यपणे २३ डिसेंबर २०२५ पासून नियोजित आहे. सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थिनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. कृषी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधी प्रवेश घेतल्यापासून तीन वर्षांसाठी वैध राहील. कृषी शिक्षणक्रमासाठी पुनर्नोंदणी करता येणार नाही. पुनर्परीक्षा ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ही सुरुवातीस ९ सप्टेंबरच्या परिपत्रकाप्रमाणे १ ऑक्टोबर होती तर विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर तसेच विशेष विलंब शुल्कासह १२ ऑक्टोबर पर्यंत आहे. ३० पर्यंत विना विलंब, ६ ऑक्टोबर पर्यंत विलंब शुल्कासह व अति विलंब शुल्कासह पुनर्परीक्षा अर्ज भरण्यास १२ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ घोषित केली आहे. परंतु महाराष्ट्रात सद्य परिस्थितीत झालेली अतिवृष्टी व त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे .अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास अडचणी येत असून त्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याच्या मुदतीत १८ ऑक्टोबर पर्यंत वाढ देण्यात आलेली आहे. ७ ऑक्टोबर पर्यंत विना विलंब ,८ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर विलंब शुल्कासह तर १८ ऑक्टोबर२०२५ पर्यंत अती विलंब शुल्कासह आता अर्ज भरता येणार आहेत. जितके विषय अनुत्तीर्ण तेव्हढ्या विषयांकरिता परीक्षा शुल्क आकारले जाईल.परीक्षा अर्ज आणि शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सत्र ,वर्षांसाठी भरावे लागेल. संबंधित परीक्षेकरिता लागणारे शुल्क,गुणपत्रक फि तसेच बी ए ,बी कॉम (कृषी शिक्षणक्रम वगळून) व इतर शिक्षणक्रमांच्या नोंदणी कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्नोंदनी शुल्क तसेच नियमित परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा तपशील व इतर माहिती,सूचना, तपशील याकरिता विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या https://ycmoudigitaluniversity.ac या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत भरावेत असे विद्यापीठ व विविध अभासकेंन्द्रामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
