
चिमूर (योगेश मेश्राम प्रतिनिधी चिमूर) लेखक सुरेश डांगे यांच्या दखल या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील बालाजी मंदिर सभागृहात वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान आणि साप्ताहिक लोक प्रतिष्ठा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार असून ग्रंथावर साहित्यिक डॉ. देवमन कामडी भाष्य करतील.प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक बंडोपंत बोढेकर,नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे,पोलीस निरीक्षक दिनेश लबडे,साहित्यिक तथा प्रसिद्ध अधिवक्ता अॅड. भूपेश पाटील,साहित्यिक डॉ. विलास गजबे,पत्रकार शोभा जयपूरकर,साप्ताहिक लोक प्रतिष्ठाचे संपादक रामकुमार चिचपाले उपस्थित राहणार आहेत.चिमूर तालुक्यातील विविध क्षेत्रात निरलस भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांच्या कार्याचा लेखाजोखा लेखक सुरेश डांगे यांनी दखल या ग्रंथात घेतला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विरेनकुमार खोब्रागडे करणार असून आभारप्रदर्शन कवी प्रकाश कोडापे करणार आहेत.याच समारंभात शहीद बालाजी रायपूरकर वीरता पुरस्कार तालुक्यातील खातोडा या गावचे दशरथ चौखे यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.झाडीबोली साहित्य मंडळ चिमूर तालुक्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.विजेत्यांमध्ये प्रथम पारितोषिक डॉ. धनराज खानोरकर, द्वितीय सुनील पोटे, तृतीय सविता झाडे, प्रोत्साहनपर पारितोषिक संदीप गायकवाड आणि अरुण घोरपडे यांचा समावेश आहे. समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान, साप्ताहिक लोक प्रतिष्ठा, झाडी बोली साहित्य मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.
