नांदगाव (वार्ताहार ) येथील वैजनाथ जिजाजी (व्हि.जे.) विद्यालयात खंडेनवमी अर्थात महानवमीच्या मुहूर्तावर विजयादशमीच्या निमित्ताने तांञिक विभागातील सर्व तांञिक आयुधांची पुजा अर्थात शस्त्रपूजन करण्यात आले._ _विद्यालयातील तांत्रिक (टेक्निकल) विभागाच्या नव्या तांत्रिक प्रयोगशाळेतील विवीध शस्ञांचे म्हणजेच तांत्रिक अवजारे- उपकरणांचे मान्यवरांच्या हस्ते परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे विधीवत् पूजन करण्यात आले.

विजयादशमी’ च्या पवित्र दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला..; तसेच प्रभू रामाने वाईट शक्तींचा नाश करून आणि सीतेला परत आणून एक आदर्श स्थापित केला. शस्त्रपूजनामुळे ह्या आदर्शांचे स्मरण केले जाते आणि दृष्ट शक्तींचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते शस्त्रपूजा ही शक्तीचे प्रतीक मानली जाते. ह्या दिवशी शस्त्रांची पूजा करून शक्ती आणि सामर्थ्याची प्रार्थना केली जाते.., ज्यामुळे व्यक्तीला धैर्य आणि यश मिळते. ह्या दिवशी घरातील शस्त्रांची आणि इतर साधनांचीही पूजा केली जाते.., ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि व्यक्तीला यश व शौर्य प्राप्त होते.

ह्या प्राचीन, ऐतिहासिक तथा दैवी परंपरेला निरंतर जपण्याचा भाग म्हणून मुख्याध्यापक मान. श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी तंञविभागातील श्री. दत्तगुरु श्रीवल्लभ दिगंबरांसह ह्या जड चेतन सृष्टीची निर्मिती करणारे सृष्टीचे मुख्य रचनाकार, दैवी शिल्पकार तथा देवदेवतांचे वास्तुकला तज्ञ संतश्रेष्ठ विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमांसमोर श्रीफळ वाढवून सर्व तांञिक आयुधांचे पूजन करुन दर्शन घेतले._ श्री. राजेश भामरे ह्यांंनी ह्याप्रसंगी खंडेनवमी अर्थात महानवमीचे ‘दिनविशेष महत्त्व’ अधोरेखित करत शस्त्रपूजनाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही उपस्थितांसमोर विषद केलीह्याप्रसंगी मुख्याध्यापक मा.श्री. लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक मान.श्री. डाॕ. जोगेश्वर नांदूरकर, तंञविभागाचे उत्साही तंञनिदेशक श्री. गिरीश निकम, अॕ.बोर्ड सदस्य श्री. भास्कर मधे, श्री. गुलाब पाटील,सौ.रुपाली झोडगेकर, शिक्षक प्रतिनीधी श्री. प्रविण अहिरे, श्री.राजेश भामरे आदी मान्यवरांसह इयत्ता ९ वी, १० वी चे विद्यार्थी ही उपस्थित होते.

_उपस्थित सर्वांना पेढे व प्रसाद वाटून हा ‘आयुध-पूजना’ चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात ह्यावेळी साजरा करण्यात आला.
