
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५२ वा दिवस
मन जाणिवेच्या पलीकडे जाऊ शकते, आपले मन जणू एखाद्या तलावासारखे आहे, आणि आपण करीत असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू त्या तलावात उठणारा एकेक तरंग, एकेक लाट आहे. ज्याप्रमाणे तलावात तरंग किंवा लाटा उसळतात, कोसळतात आणि विरून नाहीशा होतात, त्याचप्रमाणे चित्तातही विचारांचे तरंग वा लाटा सतत उठत असतात आणि मग विरून जात असतात; पण त्या अजीबातच नाहीशा होत नसतात. चित्तात उठणारे ते तरंग वा त्या लाटा क्रमशः अधिकाधिक सूक्ष्म होत जातात, परंतु सूक्ष्मस्वरूपात विद्यमानच राहतात, आणि प्रयोजन पडताच केव्हाही फिरून उदित होण्यास तत्पर असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १६ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन पौर्णिमा /कृष्ण वद्य २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५
★ १९२६ भारदस्त आवाजाने संवादफेक करुन प्रेक्षकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे हिंदी चित्रपट अभिनेते कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचा जन्मदिन.
★ १९३२ इंडियन एअर फोर्स अॅक्टद्वारे भारतीय वायूसेना स्थापना झाली.
★ १९७९ संपूर्ण क्रांतीचे प्रवर्तक, लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा स्मृतिदिन.
★ भारतीय वायूसेना दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
