
ईगतपुरी( तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर) नाशिक सुप्रसिद्ध युवा कवियत्री आरती सोनवने- गलांडे यांच्या दमदार साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना आदर्श साहित्यिका हा सन्मान नुकताच प्रदान झाला आहे आधार सोशल फाउंडेशन बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक गोवा नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड २०२५ या कार्यक्रमा चे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. नाशिक येथील सुप्रसिद्ध कवयित्री आरती सोनवणे गलांडे यांना आदर्श साहित्यिका पुरस्कार देऊन या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. आरती सोनवने या नव्या दमाच्या कवियत्री असुन आपल्या दमदार लेखणीतुन त्यांनी विविध विषयावर लेखन केले आहे.उत्कृष्ट सुत्रसंचालिका म्हणुनही त्या महाराष्ट्र भर विविध कार्यक्रमातुन चमकत आहे. त्यांचे विविध लेखनही प्रसिद्ध झालेले आहे.अखिल भारत मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा च्या त्या महिला जिल्हा अध्यक्षा आहेत. या कार्यक्रमाचे प्रसंगी अध्यक्ष मा.डॉ. अलका खोसरे (अनाथांची माऊली,सामाजिक कार्यकर्ता नृसिंहवाडी), मा. डॉ. प्रकाश कदम (प्रसिद्ध वक्ते, लेखक,शिक्षक कोगनोळी),मा. जयश्री गायकवाड (पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर), ह.भ.प. एम. पी.पाटील (प्रसिद्ध प्रवचनकार सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर), शरद सावंत (प्लास्टिक सर्जन सांगली), मा.प्रा.जयश्री रोडे (संस्थापक इमेरड पब्लिक स्कूल,श्री बालाजी एज्युकेशन नासिक), बाळासाहेब खोत (चेअरमन जय जिनेन्द्र क्रेडिट सोसायटी शमणेवाडी), कल्पना खैरनार (मिसेस इंडिया नागपूर), महेश शहा (सांगली), मा. सुजय देसाई (शिक्षक,प्रसिद्ध वक्ते कोल्हापूर), सचिन हळदकर (सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी) रवींद्र कुलकर्णी (निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे), मा.रणजीत संग्रळे (चिकोडी),मा.जगदीश वाठारकर (फिल्म डायरेक्टर कोल्हापूर), भूषण पोतदार (टॅक्स कन्सल्टंट बेडकीहाळ), प्रदीप शिरोटे (आरोग्य विस्तार अधिकारी सांगली) मा. ज्योती आदाटे (कार्यकर्त्या सांगली), विक्रम शिंगाडे (पत्रकार, संस्थापक अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते
