
नाशिक:( प्रतिनिधी)- केशरी दुधाचा आस्वाद घेत एकापेक्षा एक सरस आणि विविधांगी कवितांच्या सादरीकरणाने मखमलाबादला ‘काव्यकोजागिरी’ रंगली. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने आयोजित केलेल्या “अभिजात मराठी भाषा सप्ताहा”अंतर्गत मखमलाबादच्या रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित चोवीसाव्या वर्षीच्या ‘काव्यकोजागिरी’चा प्रारंभ प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.राजेश्वर शेळके यांच्या श्रीमंतांची दिवाळी आणि गरिबांची दिवाळी यातला फरक मांडणाऱ्या- *एक दिवाळी अंगण सजवुन सडा समार्जन करते आहे* *एक दिवाळी अंधारातच हमसुन-हमसुन रडते आहे…*या कवितेने झाला. त्यानंतर युवाकवी प्रशांत केंदळे यांच्या विघ्नहर्ता गणरायाकडे मागणे मांडणाऱ्या- *पेरलेले उगवू दे अन् पिकवलेल्या भाव दे* *अन्नधान्याची खळ्यावर रास दे लंबोदरा*या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. कवी राजेंद्र उगले, राजेंद्र सोमवंशी, अरुण इंगळे, सुरेश पवार, मुकुंद ताकाटे, मधुकर गिरी, संजय आहेर, प्रा.निशांत गुरू, प्रा.रामदास पोरजे, पंकजकुमार गवळी, प्रा.डॉ.अमर ठोंबरे, अनिता घोलप, राजेश जाधव, अजय बिरारी, अण्णासाहेब बडाख, रामचंद्र शिंदे, नंदकिशोर ठोंबरे, माणिकराव गोडसे, नितीन कोकणे, समाधान हेंगडे पाटील, संजीवनी पाटील, वैजयंती सिन्नरकर, सीमाराणी बागुल, रघुनाथ हाळदे, वाळू आहेर, विजयकुमार मते, दत्तू दाणी, योगेश जाधव, गजानन उफाडे, रतन हिरे, सविता पिंगळे, ज्ञानेश्वरी पिंगळे, गोरक्षनाथ राऊत, दिगंबर काकड, डी.एस.दुरगुडे आदींनी कविता सादर केल्या. सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा संधान पुरस्कृत उत्कृष्ट वाचक पुरस्कार ज्ञानेश्वर पिंगळे आणि दिलीप पवार यांना तर उत्कृष्ट काव्य पुरस्कार कवी सोमनाथ पवार, एकनाथ वाघ यांना प्रदान करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, उपाध्यक्ष संदीप धात्रक, कार्यवाह शंकर पिंगळे, ज्येष्ठ संचालक देवराम पवार, गोकुळ काकड, संजय फडोळ, संजय गामणे, राकाशेठ माळी, संजय काकड, सुभाष तिडके यांसह मनपाचे सहाय्यक अधीक्षक विजय काकड, नरेंद्र मुळाणे, अरुण पिंगळे, दशरथ झनकर, ग्रंथपाल ग्रंथमित्र राजेश शिरसाठ, संजय मानकर, श्याम मगर, सोनाली पाठक, दिलीप पताडे, विनोद भागवत, बाळासाहेब मानकर उपस्थित होते. डॉ.गणेश मोगल आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
काव्यकोजागिरीत कविता सादर करणारे काही मान्यवर कवी




