
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५१ वा दिवस
जगतातील धन, मान, ऐश्वर्य सारेकाही क्षणभंगुर आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात; बाकीचे सारे जिवंत असले तरी ते मेल्यासारखेच होतं. शास्त्रात म्हटले आहे की जे भगवंताच्या दासांची सेवा करतात तेच भगवंताचे सर्वश्रेष्ठ दास आहेत. मी तुम्हाला फिरून सांगतो की तुम्ही शुद्धचित्ताचे व्हावयास हवे आणि जो कुणी तुमच्याकडे येईल त्याची यथाशक्ती सेवा करावयास हवी अशा भावाने दुसऱ्यांची सेवा करणे हे शुभ कर्म होय अशा सत्कर्माच्या शक्तीने चित्त शुद्ध होते आणि सगळ्यांच्या अंतर्यामी जो शिव वसत आहे तो त्या शुद्ध चित्तात प्रकट होतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १५ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन पौर्णिमा /कृष्ण वद्य १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ७ ऑक्टोबर २०२५
★ महर्षी वाल्मिकी जयंती
★ १७०८ शिख धर्माचे दहावे गुरू गोविंद सिंग यांचा स्मृतीदिन
★ १८६६ मराठी काव्याचे प्रवर्तक, कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचा जन्मदिन.
★ १९१७ कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्मदिन.
