
निगडोळ. (प्रतिनिधी):-रयत शिक्षण संस्थेच्या मा शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक याविद्यालयाने यावर्षी दिंडोरी तालुका आयोजित शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध खेळ प्रकारात नैपुण्य दाखवून १५ सुवर्ण,६ रजत व १० कास्य पदक असे एकूण ३१ पदक तालुका स्तरावर पटकावून दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक पदकांचा सन्मान मिळवला एकूण २१ क्रीडापटूंची जिल्हास्तरावर निवड झाली.यावर्षी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा रोवून इतिहास घडविला.गोल्ड मेडल प्रथम क्रमांक पात्र विद्यार्थी प्रियंका वाघ १००मी.धावणे,अनुष्का दुशिंग थाळीफेक,समीक्षा भोये ८०मी.अडथळा शर्यत,सावित्री रोकडे १००मी.रिले,प्रतीक्षा रहेरे,समीक्षा भोये,अनुष्का दुशिंग,प्रियंका वाघ सर्व १०० मी.रिले धावणे,कोमल चारोस्कर,सुष्मिता धुळे ४०० मी.अडथळा शर्यत,धनश्री चारोस्कर,प्रियंका मालसाने,गौरी राऊत,पूजा गायकवाड,गौरी चौधरी १००मी.xरिले या सर्व १७वयोगटातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली.सिल्वर मेडल प्राप्त द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी संजीवनी गुंबाडे ८०मी.अडथळा शर्यत,उमेश चौधरी तिहेरी उडी,धनश्री चारोस्कर थाळीफेक,सावित्री रोकडे तिहेरी उडी, कांचन गांगोडे ४०० मी.अडथळा शर्यत,धनश्री चारोस्कर १००मी.धावणे या वैयक्तिक खेळ प्रकारातील विद्यार्थ्यांचीही जिल्हास्तरावर निवड झाली.ब्रांच मेडल प्राप्त तृतीय क्रमांकांचे विद्यार्थी कु.प्रतीक्षा रहेरे १००मी.धावणे,कुणाल रहेरे ११०मी.अडथळा शर्यत,पूजा गायकवाड २०० मी.धावणे,नीलम पागे तिहेरी उडी,श्वेता ढगे १००मी. अडथळा शर्यत,गौरी चौधरी,ऋतुजा डोखळे,शालिनी शिंगाडे,सुश्मिता धुळे ४००मीx४ रिले प्रकारात हे विद्यार्थी तृतीय क्रमांक ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र मिळवून तालुका स्तरावर चमकले.क्रीडापटूंच्या या घवघवीत यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना उत्कृष्ट सराव देऊन मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री.अमोल वाघमारे यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोरसे डी.डी.व सर्व रयत सहकाऱ्यांनी कौतुक केले.विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार मंडळाचे चेअरमन श्री.बबनराव यशवंत मालसाने व सर्व सदस्य,रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगणांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे दूरध्वनीच्या माध्यमातून अभिनंदन केले.निगडोळ पंचक्रोशीत ३१ पदके पटकावणाऱ्या यशस्वी क्रीडापटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
