

ओढा ( प्रतिनिधी ) युवा सामाजिक प्रतिष्ठान व मैत्री संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ०५/१०/२०२५ रोजी दिलीप भिवाजी नारद यांना सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करिता देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी सद्भावना समाजभूषण पुरस्कार 2025 महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक आदरणीय सुधाकर सुराडकर सर(l P S) माननीय महेंद्र शेठ घरत (ज्येष्ठ कामगार नेते) माननीय संभाजी राजे जाधव (राजमाता जिजाऊ यांचे घराण्यातील तेरावे वंशज सिंदखेड राजा) सौ रेश्मा जगताप ज्येष्ठ समाजसेविका (अहिल्यानगर) माननीय विलास खानोलकर (सदस्य फिल्म सेन्सॉर बोर्ड भारत सरकार) ज्येष्ठ पत्रकार सुरज भोईर तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया, कवी, लेखक तसेच मान्यवर प्रेक्षक यांच्या साक्षीने पत्रकार भुवन सीएसटी मुंबई या ठिकाणी प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप नारद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वरती उत्कृष्ट भाषण करून प्रेक्षकांना व मान्यवरांना मंत्रमुक्त केले.
