
नाशिक ( प्रतिनिधी) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची सभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाली यात कवी व गीतकार प्रकाश होळकर यांची सर्वानुमते उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वास्तुविशारक संजय पाटील यांचा विश्वस्त पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली श्री होळकर यांना विविध काव्य पुरस्कारा सह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी चित्रपटासाठी गीत लेखन केले असून कवितांचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत असून साहित्यिक मंडळावर ते सदस्य आहेत.
सर्वानुमते माझी निवड झाल्याने कमी वयात मोठे जबाबदारी मिळाली आहे कवी कुसुमाग्रजांचा आशीर्वाद समजून भविष्यात प्रयोगाशील उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असणार आहे.
–प्रकाश होळकर उपाध्यक्ष, कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
