

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०५० वा दिवस
संघटनाशक्तीच्या बाबतीत आपले राष्ट्र बरेच मागे आहे. ह्या एका दोषामुळेच इतर अनेक वाईट गोष्टी घडून येत आहेत. कोणतेही काम सगळे मिळून करण्यास आपण मुळीच तयार नसतो. आम्ही स्वतः तर काही करणार नाहीच, पण दुसरे कोणी काही कार्य करीत असेल तर आम्ही त्याला नाके मुरडीत बसू हा दोषच आपल्या राष्ट्राच्या अधःपतनाला कारणीभूत झालेला आहे. सहानुभूतीचा अभाव आणि उत्साहशून्यता हीच साऱ्या दुःखदैन्याच्या बुडाशी असलेली कारणे होत. आणि म्हणून तुम्ही या दोहोंचा कटाक्षाने त्याग केला पाहिजे. कोणत्या विशिष्ट व्यक्तीत कोणत्या सुप्त शक्ती आहेत ते तुम्हा-आम्हाला काय कळणार? ते एकट्या परमेश्वरालाच ठाऊक असते म्हणूनच सगळ्यांना संधी द्या व बाकीच्या सगळ्या गोष्टी ईश्वरेच्छेवर सोपवा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १४ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन शुक्ल /शुध्द १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ६ ऑक्टोबर २०२५
★ शरद/कोजागिरी पौर्णिमा
★ आकाश दीपदान
★ १९४९ खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे भूमिपूजन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.
★ १९७९ इतिहासकार, लेखक, वक्ते, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा स्मृतिदिन.
