
सिन्नर ( वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) सोनांबे ग्रामस्थांच्या उपस्थितीत एका आनंदोत्सवमय वातावरणात, उद्योगविश्वात नावलौकिक मिळवलेल्या नाशिक जिल्ह्याचे नामांकित उद्योजक श्री नंदकिशोर खताळे व चैतन्य नंदकिशोर खताळे यांच्या दैनिक लोकमत उद्योगरत्न पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.हा सन्मान सोहळा सोनांबे येथील संगम पोहा मिलचे संचालक, सोनांबे विविध विकास संस्थेचे चेअरमन व प्रगत उद्योजक तानाजी रामभाऊ पवार यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत खताळे परिवाराने केवळ पाटोळे गावाचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. श्री नंदकिशोर खताळे यांच्या कुशल नेतृत्वगुणांमुळे, चैतन्य खताळे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि परिवाराच्या नवोन्मेषी दृष्टीकोनामुळे उद्योगविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.वडगाव पिंगळा येथील जोगेश्वरी स्टोन क्रशर, अमृता रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्प तसेच सिन्नर येथील अमृता कन्स्ट्रक्शन या माध्यमातून त्यांनी प्रगत औद्योगिक विकासाची एक यशस्वी परंपरा उभी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक लोकमत तर्फे त्यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार 2025’ बहाल करण्यात आला आहे.या यशाबद्दल तानाजी पवार परिवारातर्फे श्री नंदकिशोर खताळे व चैतन्य खताळे यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना
श्री तानाजी रामभाऊ पवार म्हणाले,> “श्री नंदकिशोर खताळे हे आमचे व्याही असून त्यांच्या परिवाराचे उद्योग क्षेत्रातील कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा यशस्वी व दूरदृष्टी असलेल्या उद्योजकांचा सन्मान करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
या सोहळ्याला सुरज खताळे, सौ. उषाताई खताळे, पूजा खताळे, प्रियंका खताळे, अशोक कोठुळे, किसन हगवणे, मारुती तांबे, विष्णू पवार, अनिल पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे वातावरण उत्साह, अभिमान आणि आपुलकीने भारावून गेले होते. सोनांबे व परिसरातील नागरिकांनी या गौरवपूर्ण क्षणाचे मनःपूर्वक स्वागत करत खताळे परिवारास हार्दिक अभिनंदन व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
