
ज्येष्ठ समीक्षक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या ‘राजीव बर्वे यांची कविता-स्वरूप आणि आकलन’ आणि साहित्यिक राजीव बर्वे यांचे दिलीपराज प्रकाशनाचे प्रकाशित केलेले ‘मनातील पत्रे’ हे ३०००वे पुस्तक या पुस्तकांचे प्रकाशन करताना सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रकाश होळकर. समवेत डावीकडून वसंत खैरनार, विश्वास ठाकूर, विलास पोतदार, विनायक रानडे.
नाशिक (प्रतिनिधी) – गलिच्छ राजकारणाच्या काळात विवेकाची पेरणी करून सांस्कृतिक संचित निर्माण करण्याचं कार्य नाशिककर करत आहेत. अशा काळात पुण्याच्या प्रकाशक मित्राला नाशिकच्या सांस्कृतिक विश्वात प्रकाशात आणण्याचं कामही होत आहे. प्रेम म्हणजे समर्पण, निष्ठा आणि आत्मसंवाद — अशा भावविश्वाचा वेध घेणाऱ्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याने शालिमार येथील सार्वजनिक वाचनालय साहित्यक्षेत्रात नवसंजीवनी निर्माण केली.“विश्वास ग्रुप”, “महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपुर” आणि “अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ” यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनिस लिखित “स्वरूप आणि आकलन” आणि प्रकाशक दिलीप बर्वे लिखित “मनातील पत्रे” या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा नुकताच सावनाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पार पडला.या सोहळ्याचे उद्घाटन कवी, गीतकार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश होळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास ठाकूर होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनिस, कवी राजीव बर्वे, प्रकाशक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत खैरनार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.प्रकाशनावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनिस म्हणाले, “राजीव बर्वे यांच्या कवितांमध्ये जीवनातील द्वंद्व, समर्पण आणि आत्मचिंतनाचे दर्शन घडते. ‘स्वरूप आणि आकलन’ ही केवळ कविता नसून मूल्यांच्या शोधाची वाट आहे.”त्याचप्रमाणे “मनातील पत्रे” या पुस्तकाबद्दल ते म्हणाले, “या पत्रांमधून लेखकाने सूर्य, चंद्र, सागर आणि निसर्गाशी आत्मसंवाद साधला आहे. स्वतःशी संवाद साधणाऱ्या या पत्रांमध्ये संस्कृती, नातेसंबंध आणि भावविश्वाचं गहिरे दर्शन आहे.”या प्रसंगी प्रकाश होळकर यांनी विचार व्यक्त करताना सांगितले, “साहित्य माणसाला घडवतं. पुस्तक हे आपलं खरं आणि अखेरपर्यंत साथ देणारं मित्र आहे.”कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात विश्वास ठाकूर म्हणाले, “पुस्तक बुरसट विचार बदलतं, आणि समाजात जागृतीचं कार्य करतं.”या वेळी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, आणि विनोदी लेखक नरेश महाजन यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमापूर्वी झालेल्या “काव्यसंध्या”त कवी तुकाराम ढिकले, जयश्री वाघ, रतन पिंगट, मुकुंद ताकाटे, राजेंद्र सोमवंशी यांनी काव्य सादरीकरण केले, तर राजेंद्र उगले यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर आणि संयत सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.या साहित्यिक सोहळ्याने नाशिकच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनात नवा उजेड पेरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
