
सिन्नर ( वसंत गोसावी, प्रतिनिधी) –सोनांबे येथील आई भवानी डोंगरावर शारदीय नवरात्र उत्सव यंदा अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि जल्लोषात संपन्न झाला. अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्वयंसेवकांच्या सुयोजित नियोजनामुळे हा उत्सव भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला.केवळ सिन्नर तालुक्यातूनच नव्हे, तर नाशिक जिल्हा आणि राज्यभरातून हजारो भाविक आई भवानीच्या दर्शनासाठी सोनांबे येथे दाखल झाले होते. भाविकांच्या सोयीसाठी वाहनतळ, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

स्वयंसेवकांनी दिवस-रात्र परिश्रम घेऊन कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला.पंचक्रोशीतील अन्नदात्यांनी दररोज संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले होते. या सेवेत सोनांबे ग्रामस्थ, जय भवानी लॉन्स, आई भवानी मित्र मंडळ, हरसुले, वडगाव, कोनांबे, खापराळे, पास्ते, घोडे परिवार, श्रीराम मंदिर कमिटी सोनांबे, स्वराज्य ग्रुप सोनांबे, गुलाबराव बिन्नर आडवाडी, रामचंद्र बोडके, संजय आव्हाड वडगाव, आप्पा पवार लोणारवाडी, रखमाई लॉन्सचे संचालक अमोल पवार, राम कडभाणे, गणपत कडभाणे, हॉटेल राजे पार्कचे संचालक नाना पाटोळे, झाडे परिवार, तसेच हॉटेल रॉयल ग्रीन पॅलेस यांनी १११ किलो लाडूंचे अन्नदान करून भक्तीसेवेत आपला मोलाचा सहभाग नोंदवला.आई भवानी मातेच्या सेवेत अनेक भाविकांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.प्रतापराव विठ्ठल जाधव यांनी मंदिराच्या रंगकामासाठी ₹५१,०००/-, तर भगूर येथील भक्त प्रमोद कासार यांनी ₹१७,०००/- किमतीची नथ अर्पण केली.लक्ष्मण रामभाऊ वाघ यांनी सव्वा भाराची सोन्याची नथ अर्पण करून आईप्रेमाची अनोखी साक्ष दिली.शाम विनायक पवार, रतन सोपान शिंदे, आणि महेश काकड यांनी प्रत्येकी ₹११,०००/- देणगी दिली.याशिवाय नामदेव भागुजी पवार (लोणारवाडी), जिजाबाई त्र्यंबक बोडके, भरत पुंडलिक बोडके, पंढरीनाथ सदगीर, मिनाक्षी भगवान गवळी यांनी प्रत्येकी ₹५,०००/-, तर बाबुराव टेकनर यांनी ₹२,१००/- ची देणगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अर्पण केली.दररोज सकाळ-संध्याकाळ आरतीसाठी भाविकांची गर्दी उसळली होती. स्थानिक भजनी मंडळांनी भक्तिगीत, अभंग आणि आरतीच्या सुरांनी वातावरण भारावून टाकले. कोनांबे, हरसुले, वडगाव, सिन्नर, सोनारी, खापराळे, पास्ते या गावांतील भक्तांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.ड्रीम लाईट डेकोरेटर्स रांजणगाव खु. येथील रविंद्र कासार आणि मयूर कालेकर, तसेच समृद्धी इलेक्ट्रिकल्स सिन्नरचे संचालक शरदभाऊ हगवणे यांनी विद्युत रोषणाईची मोहक सजावट केली. वडनेर येथील राहुल पोरजे यांनी मंदिर सजावटीसाठी मनापासून परिश्रम घेतले.सोनांबे डोंगराच्या पायथ्याशी अनेक छोटे-मोठे व्यावसायिकांनी पूजासाहित्य, खेळणी आणि प्रसादाची दुकाने लावली होती, ज्यामुळे नवरात्र उत्सवाला ग्रामोत्सवाचा रंग प्राप्त झाला.विजयादशमीच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी दर्शन घेऊन आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मनोकामना व्यक्त केल्या.मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा आणि पायऱ्यांचा विकास करण्याची तातडीची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.सिन्नर-घोटी महामार्गावरील निसर्गसंपन्न आई भवानी डोंगर भविष्यात नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन केंद्र ठरेल, अशी श्रद्धाळू भाविकांची अपेक्षा आहे.या भव्य आयोजनासाठी सोपान बोडके, विनोद रोकडे, अक्षय पवार, सागर पवार, सागर घोडे, समाधान बोडके, धोंडीराम वारुंगसे, राणू घोडे, पुजारी संतोष घोडे, जगदीश बोडके, तसेच आई भवानी युवा मित्र मंडळ, स्वराज्य ग्रुप आणि सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे उत्सव अतिशय यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.— मंदिराचा प्राचीन इतिहासऐतिहासिक नोंदींनुसार छत्रपती शिवाजी महाराज सुरतेची लूट करून स्वराज्यात परतत असताना विश्रामगड किल्ल्यावर काही काळ विसावले होते. त्यांच्या सैन्याचा तळ त्यावेळी या डोंगराच्या पायथ्याशी होता, असे सांगितले

जाते.विश्रामगडापासून नजरेच्या टप्प्यात असलेला हा डोंगर त्या काळी एक महत्त्वाचे संरक्षणस्थान म्हणून ओळखला जायचा. याच ठिकाणी आई भवानी मातेची स्थापना झाल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम असलेला हा डोंगर आजही भक्ती, परंपरा आणि निसर्गसौंदर्याचा संगम म्हणून ओळखला जातो.
