
मनमाड (प्रतिनिधी)सांगायला अभिमान वाटतो की संदीप देशपांडे यांची कन्या सिद्धी हिचे सायकॉलॉजी वरील संशोधन जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त ठरले आहे . Scopus ही एक आंतरराष्ट्रीय डेटाबेस हे जिथे जगभरातील दर्जेदार आणि मान्यताप्राप्त संशोधन (research papers) नोंदवले जातात.अशा Scopas या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये सिद्धी संदीप देशपांडे हिचा सायकॉलॉजी वरील research paper प्रसिद्ध झाला आहे.
सिद्धीचे संशोधन जगातील टॉप-क्वालिटी जर्नलमध्ये प्रकाशित होणे ही भूषणावह बाब आहे. International Journal of Sport and Exercise Psychology
हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त जर्नल आहे जे क्रीडा मानसशास्त्र (sports psychology) व व्यायामाशी संबंधित संशोधन प्रसिद्ध करते.
यात सिद्धीच्या संशोधनाचा समावेश झाला आहे. जागतिक दर्जाच्या, अत्यंत मान्यताप्राप्त जर्नल मध्ये तिच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.अभिनंदन सिद्धी
