
सिन्नर (प्रतिनिधी) ५ ऑक्टोबर २०२५ आदिवासी विरांगणा राणी दुर्गावती व राणा पुंजा भिल यांच्या संयुक्त जयंतीनिमीत्त तसेच जागतिक शिक्षक दिना निमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात राणी दुर्गावती व राणा पुंजा भिल राष्ट्पिता महात्मा ज्योतिराव फुले साविञीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे *अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे* म्हणाले की,आदिवासी समाजात अनेक शूरवीर,विरांगणा होऊन गेले त्या पैकी महाराणी विरांगणा राणी दुर्गावती होत. राणी दुर्गावती ही आदिवासी गोंडराजे दलपतसिंह यांची पत्नी होती.मध्यप्रदेशातील जबलपुर जवळ आदिवासी गोंडराजे दलपतसिंह यांचा किल्ला होता.मुघल सम्राट अकबराला मध्यभारतात आपला विस्तार करायचा होता.या बाबतचा प्रस्ताव त्याने राणी दुर्गावतीकडे पाठवला.माञ राणीदुर्गावतीने अकबराचा प्रस्ताव धुडकावला आणि युध्द केले.युध्दात राणी दुर्गावती जखमी झाली व अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिले.पराभव दिसत असताना शञूला शरण न जाता राणी दुर्गावतीने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं.आदिवासी समाज आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानासाठी परकियांशी लढला आपल्या प्राणाचं बलिदान दिले त्यांचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी इतिहास जागृत ठेवणं काळाची गरज आहे

असे ते म्हणाले तसेच *राणा पुंजा भिल* अतिशय शूर योद्धा होता. त्याला कधी हार माहितीच नव्हती.हल्दीघाटीच्या प्रसिद्ध युद्धात महाराणा प्रतापच्या बाजूने लढणाऱ्या सर्वात विश्वासू आणि आदरणीय योद्ध्यांपैकी एक होते. मोगलांशी सामना करण्यासाठी राणा पुंजा भिल यांच्या युद्ध प्रणालीमुळे मुघलांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. मुघलांकडे ८६ हजार, तर मेवाडकडे फक्त ९००० सैनिक होते. इतकंच नाही तर मुघलांकडे हत्ती, घोडे आणि तोफा होत्या, तर महाराणा प्रताप यांच्या सेनेकडे फक्त तीर, तलवार, भाले होते. गुरिला युद्ध प्रणालीत मेवाडचे सैनिक दर्याखोर्यामध्ये लपून तीर चालवत होते. याचा थोडासुद्धा अंदाज मुघल सैनिकांना आला नाही आणि त्याचमुळे एवढ्या मोठ्या मुघल सैनिकांवर मेवाडने ताबा मिळविला.या युद्धामुळे अकबर अत्यंत अपमानीत झाला आणि सुडाने पेटून उठला. मेवाडच्या सैनिकांना असे वाटले की अकबराचे सैनिक दिल्लीला परतले आणि आता काही काळ ते युद्ध करणार नाहीत. त्यामुळे ते गाफील राहिले, परंतु मोगल सैनिकांनी अचानक मेवाडवर हल्ला केला. दोन्ही सैनिकांमध्ये भीषण युद्ध झालं. त्याचा परिणाम मेवाडला या युद्धात बरंच काही गमवावं लागलं. या युद्धामध्ये राणा पुंजासारख्या अनेक वीरांना आपले प्राण गमवावे लागले.अशा महान युध्द आपल्या सैनिकांसह आपली सर्व ताकद देशरक्षणासाठी अर्पण केली होती अशा महान योध्दास विनम्र अभिवादन. तसेच *जागतिक शिक्षक दिनानिमित्त* राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे. *या कार्यक्रमाचे सुञसंचलन शाम डांगे यांनी केले व प्रास्थाविक विजय मुठे तर आभार हरीभाऊ वरंदळ यांनी मानले*. या कार्यक्रमासाठी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,युवा नेते हरिभाऊ वरंदळ, बाळासाहेब जाधव, लखन पाचोरे, शाम डांगे, प्रकाश गुंजाळ, , दिलीप सदगीर किरण मुठे, कार्तिक मुठे आदि उपस्थित होते.
