
नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथील गट क्र. ४४२ मधील विद्युत पोल अखेर मूळ जागेवर उभा करण्यात आला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन आणि विद्युत विभागाला शेवटी कारवाई करावी लागली. घटना कशी घडली:१० सप्टेंबर २०२५ रोजी पावसामुळे गावठाण डीपीवरील एलटी पोल कोसळला होता. दुसऱ्या दिवशी दुरुस्तीच्या वेळी पोल मूळ ठिकाणी न उभा करता रस्त्याच्या कडेला ४–५ फूट अंतरावर बसवण्यात आला. त्यामुळे ताण रस्त्यावर येत होता आणि तो धोकादायक ठरत होता.लक्ष्मण बोगीर यांनी हा प्रकार ग्रामपंचायत, वायरमन आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु वारंवार आश्वासन देऊनही पोल पूर्वस्थितीत करण्यात आला नाही.

अखेर बोगीर यांनी २५ सप्टेंबर रोजी प्रशासनाला लेखी निवेदन देत, ३० सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती न झाल्यास ६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला.सोशल मीडियावरून व माध्यमांतून प्रकरण गाजल्यानंतर, अखेर प्रशासन व विद्युत मंडळ हलले आणि रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पोल मूळ जागेवर उभा करण्यात आला.या निर्णयाबद्दल लक्ष्मण बोगीर यांनी पत्रकार बांधव आणि विद्युत विभागाचे आभार मानले आहेत.त्यांनी म्हटले – “न्याय्य मागणीसाठी सातत्याने आणि शांतपणे लढा दिल्यास प्रशासनालाही प्रतिसाद द्यावा लागतो. हे यश जनतेच्या एकतेचे आहे.”-
