
अंदरसूल (प्रकाश साबरे). अंदरसूल येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी सामाजिक राजकीय कार्यकर्ते दिवंगत विलासशेठ गाडे परंपरागत कांदा व्यवसायात त्यांचे सुपुत्र उच्च शिक्षित अतुल गाडे यांनी गरुडझेप घेऊन तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योजक कांदा निर्यातदार म्हणून ख्याती मिळवली दूरदृष्टीने भविष्याचा वेध घेत कृषी क्षेत्राशी निगडित अशा वेगळ्या व्यवसायात अतुल व राहुल राम लक्ष्मण या दोघा बंधूंनी येवला व नांदगाव या दोन तालुक्यासाठी प्रसिद्ध म्यासे फर्ग्युसन TAFE या कंपनीच्या ट्रॅक्टर शोरूम चा शुभारंभ

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर श्री रेणुका मोटर्स या भव्य दालनाचा शुभारंभ ज्या माऊलीने घडविले तिच्या प्रति आदर व ऋण व्यक्त करण्यासाठी. या दोघा बंधूंनी आपल्या सुसंकृत सुशिक्षित मातोश्री श्रीमती मंगला विलासशेठ गाडे हिच्या हस्ते शुभारंभ अंदरसूल व तालुक्यातही सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते तमाम शेतकरी बंधूंच्या उपस्थित करण्यात आले त्या उपक्रमाचे जिल्हास्तरावरील अनेक बांधवांनी कौतुकाचा भडिमार या कुटुंबावर केला आहे

