
सिन्नर (प्रतिनिधी) | मातोश्री चांडक कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच जिल्हा स्तरावर पार पडलेल्या कॉम्प्युटर टॅलेंट अंतिम तिसऱ्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
8 वी ते 10 च्या गटात ग्रामीण भागातून स्वरा सोनवणे हिने जिल्ह्यात सहावा क्रमांक आणि शाळेत पहिला क्रमांक मिळवला. तसेच प्रांजल काळे हिने जिल्ह्यात बारावा तर भैरवी कमानकर हिने तेरावा क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
5 वी ते 7 वी च्या गटात श्रावणी देशमुख हिने जिल्ह्यात तिसरा क्रमांक तर काव्या घोडके हिने आठवा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत एकूण 492 विदयार्थी सहभागी झाले होते
या सर्व विद्यार्थिनींना संगणक शिक्षिका संगीता पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, सदस्य सुनील कुऱ्हे, पोपट इलग, जया सोनवणे, कावेरी गुंजाळ आदींसह सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी अभिनंदन केले आहे.
