
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४९ वा दिवस* जे पूर्णपणे निःस्वार्थी आहे व ज्या वस्तूवर आपली प्रीती जडली असेल त्या वस्तूच्या गुणगानाशिवाय किंवा आराधनेशिवाय ज्यात दुसरा विचार नसतो त्याला ‘प्रेम’ म्हणावे.” प्रेम हा असा गुण आहे की ज्याच्यामुळे माणूस नतमस्तक होतो, पूजा करतो, आणि त्याच्या मोबदल्यात काही मागत नाही. ईश्वरप्रेम हे वेगळेच आहे. ईश्वराची आपल्याला खरोखरीच आवश्यकता असते म्हणून आपण तो मानीत नाही, तर आपल्या स्वार्थी हेतूसाठीच आपण त्याला मानीत असतो. आपल्या प्रेमाचा विषय हा एक मातीचा गोळा, एक हाडामासांचा पुतळा नसून तो खरोखर मूर्तिमंत परमेश्वरच आहे असे जेव्हा माणसाला आढळून येते तेव्हाच माणूस खरेखरे प्रेम करू शकतो
स्वामी विवेकानंद..
. *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर १३ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ ★ १९२२ जेष्ठ पत्रकार, लेखक, चरित्रकार, ‘साधना’ मासिकाचे संपादक, समाजसेवक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्मदिन.
★ १९५५ भारताच्या औद्योगिक विकासात महत्वाचे स्थान असलेल्या ‘हिंदुस्थान मशिन टूल्स’ कारखान्याचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.
★ १९९१ स्वातंत्र्यसैनिक, इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा स्मृतिदिन.
