
ईगतपुरी( तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर ) देशातील कोलकत्ता, मुंबई नंतरचै तिसर्या क्रंमाकाचे सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचे वतीने आयोजीत कै.चंद्रकांत महामिने विनोदी कथा स्पर्धेतील प्रथम क्रंमाकाचे पारितोषिक सुप्रसिद्ध लेखक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना नुकतेच मान्यवराचें हस्ते प्रदान करणेत आले आहे. सावाना चे वतीने आयोजीत ५६ व्या साहित्यिक मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करणेत आला.

हा पुरस्कार साहित्यिक तथा माजी पोलीस आयुक्त बी जी शेखर पाटिल यांचे हस्ते प्रदान करणेत आला. यावेळी व्यासपिठावर सावाना अध्यक्ष प्रा.दिलीप फडके सह पदाधिकारी विक्रांत जाधव, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, सुरेश गायधनी आदिसह अनेक मान्यवर हजर होते. गायकर यांचे या यशाबद्दल अनेक साहित्यिकासह मान्यवरानीं अभिनंदन केले आहे.
