
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४८ वा दिवस* आपली दृष्टी साफ करणे आणि प्रगतीच्या व उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करीत असलेल्या मानवजातीकडे विशाल दृष्टीने पाहावयास लावणे हेच श्रीकृष्णांचे थोर व महान कार्य होते. सर्वांच्या ठायी सत्य विद्यमान आहे हे प्रथम त्यांच्याच विशाल हृदयाने अनुभवले; त्यांच्याच मुखातून प्रथम सर्वांसाठी प्रेमाचे शब्द बाहेर पडले. श्रीकृष्णांच्या संदेशात दोन कल्पना सर्वाधिक महत्त्वाच्या आढळतात. प्रथम म्हणजे विविध मतांचा समन्वय; दुसरी म्हणजे अनासक्ती. प्रेमाकरिता प्रेम, कर्तव्यासाठी कर्तव्य, कर्मासाठी कर्म हे भारतभूमीमधे, मानवाच्या इतिहासात अगदी प्रथमच सर्वश्रेष्ठ अवतार श्रीकृष्ण यांच्या मुखातून बाहेर पडलेले तत्त्व आहे.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १२ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ ★ १८८४ भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्मदिन
★ १९३५ सुप्रसिध्द मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्मदिन.
★ १९८२ मराठी कवी, बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक प्राणी दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
