
जळगाव निंबायती – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. एन. पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, भिलाजी दुकळे होते. समवेत पर्यवेक्षक व्ही डी काळे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झालीत. सूत्रसंचालन नरेंद्र अहिरे यांनी केले तर आभार एम. के. पोलगीर यांनी मानलेत.
