
नाशिक. (प्रतिनिधी ) :- आपल्या संयत समीक्षेने सर्वदूर प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ समीक्षक डॉ.एकनाथ पगार, मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे आणि ज्येष्ठ विनोदी साहित्यिक नरेश महाजन यांचा साहित्य क्षेत्रातील अविरत योगदानाबद्दल रविवार (दि.५) विशेष सन्मान केला जाणार आहे. विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, शाखा जलालपूर (नाशिक) आणि अ.भा.मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने रविवारी सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ समीक्षक डॉ.श्रीपाल सबनीस, प्रकाशक राजीव बर्वे, गीतकार प्रकाश होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे प्रणेते विनायक रानडे, रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ठाकूर, प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार आदींनी केले आहे.
