
जळगाव निंबायती (वार्ताहर) तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ नुकत्याच दाभाडी येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झाल्यात यात येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळविले असून बहुसंख्य खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*★ १७ वर्षे वयोगट**●* ऋतुजा रतन पोलगीर ४०० मीटर धावणे – प्रथम*●* साईराम सूर्यभान ढोणे ८०० मीटर धावणे – प्रथम*●* ऋत्विक रवींद्र सातपुते लांबउडी – द्वितीय*●* दीपक संजय शिंदे ३००० मीटर धावणे – प्रथम*★ १४ वर्षे वयोगट**●* निलेश बापू ढोणे ६०० मीटर धावणे – प्रथम*●* उज्वल अंबादास कऱ्हे १०० मीटर धावणे – द्वितीय व लांबउडी – प्रथम*★ १९ वर्षे वयोगट**●* ऋतुजा रतन पोलगीर १०० मीटर धावणे – प्रथम*●* चेतन संजय सीमरे उंचउडी – प्रथम*●* सौरभ अंजिनाथ तोरे ४०० मीटर धावणे – प्रथम*●* साहिल सोमनाथ कऱ्हे ४०० मीटर धावणे – द्वितीय*●* आकाश बबन भडांगे लांबउडी – द्वितीय सर्व यशस्वी खेळाडूंची जिल्हा स्तरावरील मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक निलेश निकम, श्रीमती पी. आर. आहेर, श्रीमती एस. सी. खोले आदींनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह, ग्रामस्थ व विद्यार्थींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतले.
