
वाशिम (सचिन संघई प्रतिनिधी ) :-सहकार हाच ज्यांचा ध्यास आणि श्वास आहे असे अफाट महत्त्वकांक्षी नेतृत्व म्हणजे बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राधेश्यामजी चांडक भाईजी आज त्यांचा वाढदिवस. साधारण 12000 भांडवलावर सुरू झालेली बुलढाणा अर्बन संस्था आज आशियातील सर्वात मोठी सहकारी संस्था बनली ती त्यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वामुळे ! सहकाराची समज दृढनिश्चयी वृत्ती निश्चय सामाजिक बांधिलकीचा ध्यास या जोरावर त्यांनी आदर्श सहकारी संस्थेचा डोलारा उभा केला. उत्तम आणि बुद्धिमान नेतृत्व असलेले कर्मचारी पदाधिकारी योजनेतून बुलढाणा अर्बन ला योग्य दिशा दिली.

सहकारासोबतच सामाजिक शैक्षणिक संस्कृतीक अशा विविध क्षेत्रातून त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांना 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बुलडाणा अर्बन शाखा अनसिंग विभाग वाशिम तर्फे विभागीय व्यवस्थापक श्री.अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 02/10/2025 रोजी निवासी मूकबधिर शाळा अनसिंग मुकाबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शाखा अनसिंग चे शाखा व्यवस्थापक श्री सचिन संघई व कर्मचारी वृंद यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले .कार्यक्रमाकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर तसेच त्यांचा सहकारी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कर्मचारी श्री. राहुल झंवर, सत्येन्द्र कान्हेड, सचिन फुलतांबेकर, अनिरुद्ध पाटील तसेच शिपाई शिवप्रसाद ढगे यांनी परिश्रम घेतले
