
सिन्नर (प्रतिनिधी ) शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदाते नव्हे तर शाळा, विद्यार्थी आणि समाजासाठी योगदान देणारे खरे मार्गदर्शक! याचे जिवंत उदाहरण म्हणजे विशेष शिक्षक श्री. सुनील कुऱ्हे .दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सिन्नर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म-हळ बुद्रुक येथे भेट दिली. निपुण महाराष्ट्र अंतर्गत चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असल्याचे पाहून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी सुनील कुऱ्हे सरांचे समाजोपयोगी कार्य विशेषत्वाने अधोरेखित झाले. त्यांनी शाळेला प्रवेशद्वार देणगी स्वरूपात दिले असून त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एवढे महान कार्य हाती घेतल्याबद्दल डॉ. बागुल साहेबांनी त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले.फक्त प्रवेशद्वारच नव्हे तर शाळेत कलामंच उभारणी व झाडांना ओटे बांधण्याचे काम लोकसहभागातून सुरू असून या सर्व उपक्रमांमुळे शाळेचा चेहरा-मोहरा बदलत आहे.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. धेंडुळे सर, उपशिक्षक श्री. गोर्डे सर, श्री. उकले सर, श्री. भांड सर व सौ. वर्षा कुऱ्हे मॅडम यांनी डॉ. बागुल साहेबांचे स्वागत करून त्यांना शाळेच्या प्रगतीची माहिती दिली. सुनील कुऱ्हे यांचे हे योगदान केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
