
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४७ वा दिवस अध्यात्मिक अंतःप्रवाह बलशाली असले म्हणजे समाजाचे बाह्य स्वरूप त्यानुसार आपोआप आकार घेते. प्रत्येक राष्ट्रातील सामाजिक व्यवस्था या त्या राष्ट्राला प्राणभूत असतात आणि इतरत्र असलेल्या व्यवस्थांच्या चौकटीत या राष्ट्रातील समाजाला बसवू म्हटले तर ते घातक ठरेल. त्या देशाला अनुरूप अशा नव्या सामाजिक व्यवस्था घडल्याशिवाय जुन्या व्यवस्था फेकून देणे हे हिताचे नाही. प्रगती, विकास, बदल हे सावकाशपणे होतात. देशातील माणूस बदलला, की देश आणि तेथील सामाजिक व्यवस्था बदलणे अपरिहार्य होते.
स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ११ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर २०२५ ★ पाशांकुशा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसर्या वेळी सुरतेवर स्वारी केली.
★ १८६७ शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचा स्मृतीदिन
★ १९०३ हैदराबाद मुक्ती संग्रामातील नेते, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्मदिन.
★ १९५९ विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा स्मृतीदिन.
