
नांदगाव – (प्रतिनिधी ) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छता अभियान पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियानाचे उद्देश सांगताना लोकांमध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये स्वच्छते बद्दल जागरूकता वाढवणे, समाजामध्ये स्वच्छतेची सवय आहे संस्कृती निर्माण करणे, स्वच्छ भारत हे ध्येय साधण्यासाठी नागरिकांना श्रमदान करण्यास प्रोत्साहित करणे हे सांगितले. विद्यालयाचे पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यानंतर सर्व विद्यार्थ्यां ,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.
