
नाशिक: ( प्रतिनिधी)- हीरक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या मखमलाबाद येथील ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सोमवार दि.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.००वा. ‘काव्यकोजागिरी’ या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे चोवीसावे वर्ष आहे. नाशिक जिल्ह्यातील नव्याजुन्या कवींसह वाचनालयाच्या सभागृहात होणाऱ्या या कविसंमेलनात परिसर आणि जिल्ह्यातील मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी ग्रंथपाल ग्रंथमित्र राजेश शिरसाठ (९९२१३५०९५८) आणि सोनाली पाठक (८७९३५६५४१०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाचनालयाच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
