
सिन्नर (प्रतिनिधी )२ ऑक्टेबर २०२५ धम्मचक्र प्रवर्तन दिन ,महात्मा राजा रावण व महिषासुर राजा यांच्या स्मृतिस तसेच, राष्टपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्र यांची जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले* या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा राजा रावण व महत्मा राजा महिषासुर, सम्राट आशोक राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, मा.प्रधानमंत्र लाल बहादूर शास्त्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले*धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन* हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत “धम्मचक्र प्रवर्तन” केले; तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला “धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन” असेही म्हणले जाते.*महात्मा रावण* हा आदिवासींचा शूर ,वीर,हुशार व कल्याणकारी राजा होताआदिवासी राजे आर्यांच्या आक्रमणापासून आदिवासींचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत होता.काही आदिवासी राजे आर्यांवर प्रति आक्रमण करत.रावणानेही तेच केले.त्याने आदिवासींचे रक्षण केले म्हणून त्याला राक्षस म्हटले गेले.बऱ्याच आदिवासी राजांना अशाच प्रकारे राक्षस कल्पिले गेले व.राक्षस हा दुष्ट ,अक्राळविक्राळ वगैरे दाखविले गेले.हे फक्त आर्यांच्या फायद्यासाठी. रावण दहन बंद करायला पाहिजे, रावण हा आमचा राजा आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्या समूहांना सारखे मत आहे. अल्पसंख्याकांना सुद्धा महत्त्व आहे. आपण त्यांच्या भावनांचा श्रद्धांचा आणि त्यांच्या प्रथांचा आदर केला पाहिजे *राजा महिषासुर* हेआदिवासी समुदाय, महिषासुराला राक्षस न मानता आपला पूर्वज आणि राजा मानतात. महिषासुर आपले जमातीच्या लोकचे रक्षण करत म्हणून त्याला आदिवासी राजाच्या रूपात पाहतात महिषासुर हा आदिवासी दृष्टिकोन पूर्वज मानतात आदिवासी जमाती, जसे की गोंड आणि असुर, महिषासुराला राक्षस न मानता आदिवासी समुदाय महिषासुराला आपल्या इतिहासाचे प्रतीक मानतात आणि त्याला त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाचा भाग म्हणून पाहतात.*महात्मा गांधींनी* आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वतःदेखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत – पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. *माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री* हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात कणखर नेतृत्व दिले. लाल बहादूर शास्त्री चे गरीब परिस्थितीतही त्यांनी शिक्षण घेतले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय झाले. राजकीय कारकीर्द१९६१ ते १९६३ या काळात त्यांनी गृहमंत्री म्हणून काम केले. ९ जून, १९६४ रोजी त्यांनी भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध त्यांच्या कार्यकाळात १९६५ मध्ये दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध झाले.या युद्धात भारता’जय जवान, जय किसान’ ही घोषणा त्यांनी दिली होती, जी देशभक्ती आणि कणखर नेतृत्वाचे प्रतीक बनली.निधन ताश्कंद येथे करार केल्यानंतर ११ जानेवारी, १९६६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अशा सर्व महान राजास व विचारवंत आभिवादन याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, विजय मुठे ,निवृत्ती भांगरे,लखन पाचोरे,रोहित मुठे,किरण मुठे,शाम डांगे, प्रकाश गुंजाळ, दिपक कांबळे आदि उपस्थित होते
