
.नांदगाव – (प्रतिनिधी ) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे प्रणेते लाल बहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी बोलताना सांगितले की, भारताचा स्वातंत्र्यसंग्रामात अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावली. त्यांनी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा वापर करून शांततापूर्ण मार्गाने ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा दिला. संयुक्त राष्ट्र संघाने २००७ मध्ये २ ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ म्हणून घोषित केला. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयीच्या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, त्यांचा जीवनप्रवास साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशाप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. ‘जय जवान ,जय किसान’ हे त्यांचे घोषवाक्य आजही देशातील शेतकरी (किसान )आणि सैनिक (जवान) यांच्या महत्त्वावर जोर देते आणि देशाला प्रेरणा देते. त्यांना मरणोत्तर १९६६ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. लाल बहादूर शास्त्री हे एक साधे ,नम्र आणि अत्यंत कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जातात. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
