
नांदगाव (प्रतिनिधी)- येथील मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या संस्कृत मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ यशस्वीपणे संपन्न झाला. नाशिकमधील सुप्रसिद्ध *शंकराचार्य न्यास* या संस्थेमार्फत विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी मधील जे विद्यार्थी 2025 मधील वार्षिक परीक्षेत संस्कृत विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून यशस्वी झालेले आहेत. त्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी विद्यालयातील एकूण 21 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतात पुढील वर्षीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून असेच उज्वल यश प्राप्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे -पाटील , विजय काकळीज ,अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
