
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज २ ॲाक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त या महापुरूषांना विनम्र अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६वी जयंती व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १२१ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हीरे, डॉ.बाजीराव आहिरे, प्रा.उज्वल शेलार, प्रा.बापू शेळके, श्री.रवींद्र होळकर, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर व रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
